माघी यात्रेत विठ्ठल मंदिर राहणार बंद
दशमी - एकादशी ला मंदिरात प्रवेश नाही : मंदिर समिती
![]() |
vithhal mandir pandharpur |
पंढरपूर- ( प्रतिनिधी ) कोरणा च्या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेल्या लोकांचा विचार करता श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने माघी यात्रेदरम्यान दशमी व एकादशीम्हणजेच 22 व 23 फेब्रुवारी रोजी भाविकांना मंदिर दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आईन मागी यात्रेतही भाविकांना आषाढी व कार्तिकी यात्रे प्रमाणे पंढरीत न येण्याचे आव्हान मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शनाकरता दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. येत्या 23 फेब्रुवारी रोजी मागि यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. मात्र,महाराष्ट्र शासनाने लोक डाऊन जाहीर केला आहे. याची दखल घेऊन गर्दी होऊ नये, म्हणून मागे यात्रेत दशमी आणि एकादशी दिवशी ( 22 व 23 फेब्रुवारी ) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना सोडण्यात येणार नाही. 24 पासूनम्हणजेच द्वादशी पासून भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात पूर्ववत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. माझी यात्रेच्या नियोजनासंदर्भात मंगळवार,2 रोजी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची बैठक सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.याप्रसंगी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, माधवी निगडे, शकुंतला नडगीरे,नगराध्यक्ष साधना भोसले आदी उपस्थित होते . सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की , कोरोनाचे सावटअजून पूर्ण संपलेले नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू आहे. अद्याप लसीकरण पूर्ण झालेले नाही . यातच येत्या 23 फेब्रुवारी रोजी मागे एकादशीचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला भाविक पंढरपूरला मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.हे लक्षात घेऊन गर्दी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून दशमी आणि एकादशी असे दोन दिवस भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.किंवा नाही या विषयासंदर्भात शासन निर्णय घेईल.यात्राकाळात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार चे नियम चालत आलेले आहेत ते सर्व होतील, असेही अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पंढरीत भाविकांना प्रवेश मिळणार का ? शासन निर्णयाकडे लक्ष
माघी यात्रेत दशमी व एकादशी दिवशी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांना पंढरीत न, येण्याचे आव्हान मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. मंदिराबाहेरून नामदेव पायरी येथून भाविकांना दर्शन घेण्यास येऊ दिले जाणार का ? तसेच मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्याची दुकाने सुरू ठेवणार की बंद राहणार, याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे पंढरपूर वासियांचे लक्ष आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा