शेतकरी आंदोलनाआडून पाक रचू शकतो मोठा कट
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा इशारा
चंदिगड - ( प्रतिनिधी ) तिन्हीं कृषी कायद्यान विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन आंदोलना आड पाकिस्तान भारताविरुद्ध एखादा गंभीर कट रचू शकतो. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी मार्ग काढायला हवा, असे गंभीर विधान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केले आहे. कृषी कायद्याविरुद्ध मंगळवारी पंजाब सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सिंग यांनी वरील प्रमाणे मत व्यक्त केले. भाजपने मात्र या बैठकीवर बहिष्कार घातला. सिंग पुढे म्हणाले, ' ही वेळ आपल्या अहंकारात वेगळे उभे राहण्याची नाही. आपले राज्य आणि आपल्या लोकांना एकत्रित आणण्याची ही वेळ आहे. ' दिल्ली सीमेवर पोलिसांकडून व गुंडांकडून पंजाबातील शेतकऱ्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोपही सिंग यांनी केला. सर्व राजकीय पक्षांनी मिळून कृषी कायद्याच्या विषयावर केंद्र सरकारला विरोध करण्याची आवश्यकता आहे, असेही सिंग यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान अपघात, आजारपणासह वेगवेगळ्या कारणांनी मरण पावलेल्या 88 शेतकऱ्यांना या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली.CM amarindar sinh
#amarindarsinh #pakistan #farmerprotest
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा