maharashtra day, workers day, shivshahi news,

सरकारने वीज बिलाबाबत बोलल्याप्रमाणे वागावे : जानकर

महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

mahadev jankar, mseb, mahavitaaran, shivshahi news
mahadev jankar

पंढरपूर - ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडी सरकारने वीज बिलाच्या बाबतीत घुमजाव करू नये. कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे या सरकारने वीज बिल माफ करू , असे जाहीर केले होते. त्यानुसार कार्यवाही करावी , अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.

महादेव जानकर हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असताना पंढरपूर येथे पक्ष आढावा बैठकीच्या निमित्ताने आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलताना जानकर म्हणाले की, कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्व जनता परेशान आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने वीज बिल सरसगट पूर्णपणे माफ केले पाहिजे. एखाद्या उद्योगपतीचे बिल एका मिनिटात माफ होते.परंतु सामान्य शेतकरी , कामगार , मध्यमवर्गीय यांच्या प्रश्‍नावर मात्र सरकारकडून कायदा दाखवण्याचा प्रयत्न होतो. कायदा न दाखवता वीज बिल माफ करावे , अशी मागणी केली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक पार्थ पवार यांनी लढवावी , अशी चर्चा आहे . याबाबत विचारले असता जानकर म्हणाले की , पंढरपूरची जनता सुज्ञ आहे . जनता योग्य निर्णय घेईल . त्यामुळे योग्य त्या उमेदवाराला विठोबा पावेल. त्यामुळे कुणी आले आणि कोणी गेले , या यामुळे फरक पडणार नाही. पंढरपुरात रासप ची ताकद नाही.त्यामुळे रासप पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार नसल्याचे स्पष्ट केले.तसेच कोणत्याही पक्षाला एखाद्या जातीच्या विरोधात जाणे महागात पडेल. धनगर समाजाची केस कोर्टात चालू आहे. फडणवीस सरकारने धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सध्याच्या राज्य सरकारने बजेटमध्ये त्याच्यासाठी एक रुपया देखील तरतूद केली नसल्याचे सांगितले.

आ.गोपीचंद पडळकर हे राज्य दौरा करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला भाजपाकडून साइड ट्रॅक केले जात आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना जानकर म्हणाले की , तसे काही नाही. पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणी कुठे जावे , याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी कोणाला साइड ट्रॅक करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगत आ. प्रशांत परिचारक हे भाजपाचे सहयोगी सदस्य असले तरी उद्या माझ्या पक्षातही ते येऊ शकतात.ते नाही आले तर त्यांचे बंधू उमेश परिचारक माझ्या पक्षात येऊ शकतात. ताकद असेल तर तो पुढे जाऊ शकतो. असे सांगत परिचारकांच्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !