पंधरा गावचे सरपंच पद आरक्षण चुकले
शासनाकडे मागविले मार्गदर्शन
 |
sarpanch aarakshan
|
सोलापूर - (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत काढताना तहसीलदारांच्या नजरचुकीने तीन तालुक्यातील पंधरा गावच्या सरपंच पदाचे आरक्षण चुकले आहे. याबाबतचा अहवाल संबंधित तहसीलदारांनी पाठवला असून तो अहवाल शासनाकडे पाठवून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असून सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.आरक्षण सोडत काढत असताना काही ठिकाणी पूर्वीचे आरक्षण गृहीत धरून पुन्हा तेच आरक्षण काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यात माढा तालुक्यातील सहा,बार्शी तालुक्यातील सात आणि करमाळा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. माढा तालुक्यातील परिते , लहू , तांबवे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसुचित जाती स्त्री एवजी अनुसूचित जाती अर्थात सर्वसाधारण असे वाचण्यात आले आहे. ग्रामपंचायत भोगेवाडी जाखले, कारण व रिधोरे या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती ऐवजी अनुसूचित जाती स्त्री असे काढण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील कुंभेज, ग्रामपंचायतीचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, तर तिसरे ग्रामपंचायतीचे आरक्षण नामाप्र पडले आहे. त्यामुळे नजरचुकीने या गोष्टी वाचण्यात आल्या आहेत. त्यामुळे वरील दोन्ही तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला आहे. बार्शी तालुक्यातील कापसी, सुर्डी, तुळशीदास नगर, तांदुळवाडी, ममदापूर, घाणेगाव,व हिंगणी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण चुकीचे निघाले असून याठिकाणी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे.घाणेगाव आणि महिला आरक्षण निघाले असून त्या ठिकाणी दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकार्यांकडे पाठवला असूनमहसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.त्यानंतर या ठिकाणी योग्य तो बदल करून त्याचे फेर आरक्षण घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा