धनंजय मुंडे च्या अडचणी वाढल्या
धनंजय मुंडेंच्या विरोधात पुन्हा तक्रार दाखल
मुंबई -( प्रतिनिधी ) महा विकास आघाडी सरकार मधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. त्यांच्यासमोर आणखीन एक नवीन संकट उभे राहिले असून, त्यांची दुसरी पत्नी करुणा यांनी त्यांच्या दोन मुलांना मुंडे यांनी मागील तीन महिन्यापासून बंगल्यात डांबून ठेवल्याची तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. करुणा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात मागील तीन महिन्यापासून डांबून ठेवले आहे. त्यांना माझ्याशी बोलणे आणि भेटण्याची परवानगी नाही. हा राजकीय शक्तीचा दुरूपयोग आहे. इतका अत्याचार तर रावणाने देखील केला नसेल.
आपण 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर गेले असताना आपल्याला मुंडे यांनी 30 ते 40 पोलिसांना बोलावून आपल्याला हाकलून दिले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नसून मुलांमध्ये 14 वर्षीय मुलगी आहे. मात्र तिच्यासाठी कुणी केअरटेकर ही नाही, असे म्हणत मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करत असल्याचा गंभीर आरोपही करुणा यांनी केला आहे. माझ्या मुलासोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असतील असेही त्यांनी तक्रार नमूद केली आहे. एवढंच नाही तर ,पोलिसांनी या प्रकरणी सहकार्य न केल्यास आणि मला मुलांना भेटू न दिल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय किंवा आजाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची परवानगीही पोलिसांकडे मागितली आहे. धनंजय मुंडेच्या अडचणी अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा