दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना अटक
गुन्हे शाखेची कारवाई ; सहा लाख चाळीस हजारांच्या नऊ दुचाकी जप्त
![]() |
bike chor |
सोलापूर - ( प्रतिनिधी ) शहर, जिल्हा तसेच उस्मानाबाद व कर्नाटकातून मोटरसायकली चोरून त्यात दुचाकी सोलापुरात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमोल धोत्रे व शरीफ शेख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख पंचेचाळीस हजाराच्या 9 मोटारसायकली जप्त केल्या. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली.
अमोल महादेव धोत्रे ( रा. अणदूर ,ता. तुळजापूर ) व शरीफ शेख (रा.झटकळ ,ता. तुळजापूर) आशिया 28 मोटरसायकल चोर त्यांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी शहर व जिल्ह्यात मोटरसायकली चोरल्या होत्या. काही मोटरसायकली या परराज्यातून चोरल्या होत्या. या चोरलेल्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी हे दोन्ही भामटे आहे सोलापुरात आले होते.
ही बाब गुन्हे शाखेच्या पथकाला समजल्यावर पोलिसांनी हैदराबाद रोडवरील मंत्री चांडक नगराजवळ दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्या दोघांनी आणखीन एका साथीदाराच्या मदतीने मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली व त्यांच्याकडे असलेल्या मोटरसायकल सुद्धा चोरीचीच असल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींनी उमरगा , आळंद, ,उस्मानाबाद तसेच शहर परिसरात चोरलेल्या 9 मोटारसायकली व गुन्ह्यात वापरलेली कार,असा सहा लाख पंचेचाळीस हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त हा अभय डोंगरे, पो.नी. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कुंभार, पो.काॉ. फुटाणे, पाटील यांनी पार पाडली.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा