गॅसचा भडका ; सिलेंडर पंचवीस रुपयांनी महागले
पेट्रोल - डिझेल दर प्रत्येकी 35 पैशांनी वाढले
नवी दिल्ली - ( प्रतिनिधी ) अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन दिवसांनी घरगुती वापराचे गॅस सिलेंडर तब्बल पंचवीस रुपयांनी महागले आहे.विनाअनुदानित गॅस सिलेंडर दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइल च्या दरात ही वाढ झाल्यानेसार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल-डिझेल दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली.
वाढत्या महागाई ने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही ताजी दरवाढ आणखीन हैराण करणारी ठरणार आहे. गेल्या वर्षभरात पेट्रोल दरांमध्ये पंधरा ते सोळा रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दर महिन्याचे बजेट आधीच कोलमडले होते. त्यातच इंधन दर सतत वाढत असल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 29 डॉलर्स प्रती बॅरल वर पोचले आहेत. ताजा दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 93.20 आणि 83.67 रुपयांवर गेले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रति लिटर चे दर 86.65 रुपयांवर तर डिझेल दर 35 पैशांनी वाढून 76 . 83 रुपयांवर गेले आहेत. चेन्नई मध्ये हेच दर क्रमशः 89.13 आणि 82.04 रुपयांवर तर कोलकत्ता येथे 88.01 आणि 80.41 रुपयांवर गेले आहेत.अलीकडेच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वर कृषी उपकरण लावला होता. पेट्रोल वर हा उपकर अडीच रुपयांचा असून डिझेलवर तो चार रुपयांचा आहे. उपकाराचा थेट फटका ग्राहकांना बसणार नसल्या चे त्या वेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी विना अनुदानित गॅस सिलेंडर दरात पंचवीस रुपयांनी वाढ केल्यानंतर दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरचे दर 719 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकत्ता येथे हेच दर 745. 50 रुपयांवर गेले असून मुंबई ते 710 तर चेन्नईमध्ये ते 735 रुपयांवर गेले आहेत.
महागाई भडकणार
देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचे दर आज वरच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. इंधन दरवाढीचा थेट परिणाम महागाई वाढण्यावर होणार आहे. विशेषतः डिझेल दरवाढीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होतो. यामुळे शेतकऱ्यांचा कृषी वरील खर्च वाढतोच, मालवाहतुकीचे भाडे वाढल्याने महागाईला चालना मिळते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा