पोलिओ लसीकरण ड्रॉपरचे टोपणही बाळाच्या तोंडात
भाळवणी आरोग्य केंद्रातील घटना ; तिघांना 'कारणे दाखवा 'नोटीस
![]() |
world polio day |
पंढरपूर - (प्रतिनिधी ) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार, 31 जानेवारी रोजी भाळवणी (ता. पंढरपूर )प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वर्षाच्या लहान बाळाला पोलिओ ची मात्रा देताना ड्रॉप वरचा बारीक तुकडा बाळाच्या पोटात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बाळाला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या तीन कर्मचार्यांना 'कारणे दाखवा 'नोटीस बजावण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेला पोलिओ लसीकरणाची मोहीम सोलापूर जिल्ह्यात रविवारी राबवण्यात आली. याकरता आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रासह अंगणवाड्यांमध्ये लसीकरणाची सोय केली होती. त्यामुळे भाळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भाळवणी येथील माधुरी बुरांडे व बाबा बुरांडे यांनी त्यांच्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देण्यासाठी आणले होते. लस देताना आरोग्य केंद्रातील महिला कर्मचारी लांबूनच बाळाच्या तोंडात टाकत होती. यावेळी लस तोंडात टाकताना हलगर्जीपणा केल्याने लस्सी बरोबर ही ड्रॉपरचे टोपणही ( लहान तुकडा ) बाळाच्या तोंडात गेले. यामुळे बाळाला त्रास होऊ लागला. यानंतर या बाळाला पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बाळाची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बाळावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली औषध उपचार सुरू आहेत.या प्रकरणामुळे भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
रविवारी पोलीओ लसीकरणावेळी माधुरी बुरांडे यांच्या एका वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देताना त्याच्या पोटात लसी बरोबर प्लास्टिकचा लहान तुकडा गेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे एक्स-रे व सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. बाळाच्या आरोग्याला सध्या तरी धोका नाही. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित तीन कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ए.डी. रेपाळ , वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा