पंढरपूर तहसील कार्यालयासमोर चूल मांडून केला केंद्र सरकारचा निषेध
![]() |
shivsena pandharpur |
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) देशातील सर्वसामान्य माणूस सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीस आला आहे.पेट्रोल-डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल अशी अवस्था असून इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडत आहे. तर घरगुती बाप घराचा गॅस सिलेंडरचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशातील जनतेत प्रचंड संताप असताना केंद्र सरकार मात्र मूग गिळून बघ्याची भूमिका घेत आहे ,असा आरोप करीत शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करीत चूल मांडून केंद्र सरकारचा निषेध करत असल्याचे निवेदन तहसीलदार विवेक साळुंके यांना देण्यात आले. यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले की , गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल , डिझेल दरवाढ सतत सुरूच आहे.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव , शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे , तालुका प्रमुख महावीर देशमुख , शहर प्रमुख रवी मुळे , जयवंतराव माने , संजय घोडके , माऊली अष्टेकर , काका बुरांडे , प्रवीण शिंदे ,
यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात इंधनाचे दर वाढत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही , अशीच केंद्र सरकारची नीती आहे. महागाईच्या या भडकणार या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा