शहरातील सात कार्यालयासमोर वीज बिल माफीसाठी आंदोलन
पोलीस पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की
सोलापूर - ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील लोक डाऊन काळातील घरगुती , शेती पंप , व्यापारी , लघूउद्योजकांची वीज बिले माफ करावीत.या मागणीसाठी भाजपच्या वतीने शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या वीज वितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोडबसवण्णा चौक येथील कार्यालयासमोर आंदोलन सुरू असताना भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट आणि धक्काबुक्कीही झाली.यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
यावेळी नगरसेवक किरण देशमुख , राजकुमार पाटील , संजय कोळी , बिज्जू प्रधाने , समाधान आवळे आदी उपस्थित होते.भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जुनी मिल येथील वीज वितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावर तत्काळ तोडगा काढावा , अन्यथा या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लोक डाऊन च्या काळात सर्व व्यवहार , बाजारपेठा , रोजगार ठप्प झाल्याने आर्थिक संकट ओढवले होते मिटर रिडींग मधील त्रुटी चुकीची विज बिले आल्याने वीज ग्राहकांच्या तक्रार रिचा ओघ वाढला होता तरीही शासनाने ग्राहकाच्या बाजूने विचार केला नाही. उलट वीज तोडण्या करण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे या विरोधात भाजपच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन कारल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली आहे. यावेळी माजी उपमहापौर शशिकला बत्तुल , वड्डेपल्ली उपस्थित होते. स्वागत नगर येथील वीज वितरण कार्यालयासमोर आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री निवास करली , शशी थोरात , अण्णाराव बाराचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महावितरणाच्या जोडबसवंण्णा , बलिदान चौक , तुळजापूर वेस ,व्हिव्हको प्रोसेस , यशवंत नगर , जिजामाता नगर , वीट भट्टी , जुळे सोलापूर , पाण्याची टाकी येथे आंदोलन करण्यात आले.
चार देशमुखांनी घेरले वीज वितरण विभागाला
वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात त्यांनी भाजपच्या वतीने विविध ठिकाणी असणाऱ्या वीज वितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.सुभाष देशमुख , आ.विजयकुमार देशमुख , जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन वीज वितरण विभाग आणि राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शुक्रवारी विविध ठिकाणी देशमुखांनी जवळपास वीज वितरण विभागाला घेरले होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा