बार्शीत अकरा लाखांचा दरोडा
सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून महिलेला लुटले
बार्शी - ( प्रतिनिधी ) घरात एकटीच महिला असल्याचा अंदाज घेत जिन्याचे कुलूप तोडून सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. यामध्ये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 11 लाख 34 हजार सहाशे रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना शुक्रवारी ( दिनांक 5 ) रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
कालींदा ईश्वर मुंढे ,( वय 51, रा. गौतम मंगल कार्यालय जवळ , सुभाष नगर , बार्शी , मूळ रा. तांबेवाडी ता. भूम ) यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.यादीची मुले शेतीकामासाठी तांबे वाडी येथे जात असतात व तेथेच मुक्कामास थांबतात त्यामुळे नातवंडांना घेऊन त्या घरात राहतात. गुरुवारी रात्री ही त्या नातवंडा सह बेडरूममध्ये झोपल्या होत्या. दरम्यान ,अचानक धक्का लागल्यामुळे त्या जाग्या झाल्या. तेव्हा खोलीतील लाईट चालू होती.खोलीमध्ये अंदाजे २० ते २५ वर्षाचे , हाफ जीन्स पॅन्ट व जर्किन घातलेले चार अनोळखी तरुण त्यांच्याजवळ उभे होते. खोलीच्या दरवाजा जवळ एक जण उभा होता. तर बाहेर एक तरुण बांबू घेऊन उभा असल्याचे दिसले. घरामध्ये आलेल्या चार तरुणांपैकी एकाने सुरा दाखवून बेडवर झोपलेल्या स्थितीथच दरडावून ऐ आज्जे , माल सांग कुठंय , असे विचारले.त्यावेळी फिर्यादी घाबरून ओरडत असताना खोलीत आणखीन एकाने त्याचे तोंड बेडरूममधील गोधडी ने दाबून धरले. त्यानंतर त्या चोरट्यांनी खोलीतील लोखंडी कपाट उचकटून लॉकरमध्ये ठेवलेल्या मधील सोन्याचे दागिने ठेवलेला पितळी डब्बा व रोख रक्कम , असा 11 लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला.याबाबत आणखी सहा जणांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर , पो.नि. संतोष गिरी गोसावी , गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सपोनि उदार हे करत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा