डीवीपी फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात
पंढरपूर - ( प्रतिनिधी ) डीवीपी चषक फुटबॉल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या स्पर्धेचे उद्घाटन डीवीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील , पोलीस निरीक्षक अरुण पवार , तहसीलदार विवेक साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण युवकांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण त्यांना यथायोग्य संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. संधी उपलब्ध करून देण्याचा मूळ हेतू केंद्रस्थानी ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतात प्रसिद्ध असलेल्या पारंपारिक क्रिकेट आधी खेळाच्या व्यतिरिक्त इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळावे , हादेखील यामागील हेतू आहे. जितके जास्त क्रीडाप्रकार प्रसिद्ध होतील , तितक्या अधिक संधी उपलब्ध करून देता येतील , अशी व्यापक भूमिका यामध्ये आहे.यापूर्वी 1983 मध्ये पंढरपूर येथे अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आजच अशी स्पर्धा आयोजित होत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील क्रीडाप्रेमी नागरिकांनी युवक अत्यंत आनंदी झाले आहेत.भक्तांची मांदियाळी असलेल्या आपल्या पंढरपूरला किडे ची पंढरी म्हणून देखील ओळख मिळावी , अशी माझी मनीषा असल्याचे सांगितले. याप्रसंगी साईनाथ अभंगराव , महादेव धोत्रे, संजय ननवरे , विशाल मर्दा , पांडुरंग बोडके , भालचंद्र देवधर , डॉआरीफ बोहरी , अर्जुन पवार , प्रशिक्षित किरण जाधव , सुधीर अभंगराव , युवराज मुचलंबे , ओंकार जोशी , ओंकार वाळुजकर , संजय अभ्यंकर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा