गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात अवैध धंदे
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुतण्याचाच घरचा आहे.
![]() |
home minister anil deshmukh |
नागपूर - ( प्रतिनिधी ) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातच खुलेआम अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनीच केला आहे. नागपुरातील काका-पुतण्या मधील ' का रे हा दुरावा ' या निमित्त्याने जनतेसमोर आला आहे.विशेष म्हणजे राज्यातील सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महा विकास आघाडी सरकारमधील प्रमुख सहकारी पक्ष असतानाही काँग्रेसने अशा प्रकारचा आरोप केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा वृत्तांला दूजोरा मिळाला आहे.नागपूरच्या राजकारणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध काँग्रेस नेते आशिष देशमुख असा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो. मात्र राज्यात आघाडी सरकार मध्ये दोन्ही पक्ष सहभागी असल्याने गेल्या काही महिन्यापासून हा संघर्ष थांबला होता.मात्र आशिष देशमुख यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने हा संघर्ष पुन्हा नव्याने भेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यातही अशिष देशमुख यांनी भविष्यात काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी ची सुरुवात नागपुरातून झाल्याचे बघायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते राष्ट्रवादी परिवारसंवादाच्या नावाने कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. असाच एक मेळावा काटोल मतदार संघात त्यांनी घेतला. यावर अशिष देशमुख यांनी आक्षेप नोंदविला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा