सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक
मनपा आयुक्तांकडे खंडणी मागितल्या चे प्रकरण
![]() |
Rajesh Kale |
नियमबाह्य कामासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करणे तसेच खंडणी मागण्याचे गंभीर आरोप उपमहापौर राजेश काळे यांच्यावर आहेत.उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षाने उपमहापौर पदावरून हकालपट्टी करावी,अशी मागणी भाजपसह विरोधी पक्ष तसेच कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे.
जुळे सोलापुरात सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी ई-टॉयलेट सह अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.ही कामे नियमबाह्य असल्याचे सांगत यासाठी पत्रव्यवहार होणे अपेक्षित असल्याचे पांडे यांनी उपमहापौर राजेश काळे या सांगितले होते. त्यावर संतापलेले काळे यांनी पांडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. या घटनेनंतर महापालिका अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ महापालिका कामगार संघटनेच्या सदस्यांनी जोरदार आंदोलन केले. काळे यास तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर काळे फरार झाले होते. उपमहापौर काळे मंगळवारी सकाळी पुण्याहून लातूर कडे निघाले होते. रुपाभवानी मंदिर परिसरात त्यांना सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात हजर केले. दरम्यान,उद्या बुधवारी काळे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने उपमहापौर काळेला अटक केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा