maharashtra day, workers day, shivshahi news,

यंदा तिळगुळा सोबत लस ही घ्या !

 यंदा तिळगुळा सोबत लस ही घ्या !

दहा दिवसात महाराष्ट्रासह देशभरात करोना लसीकरण मोहीम, केंद्र सरकारची घोषणा

Corona vaccine, makar sankraanti, tilgul, shivshahi news
Corona vaccine
नवीदिल्ली - (प्रतिनिधी) पुढील आठवड्यात मकर संक्रांतीच्या पर्वात महाराष्ट्रासह देशभर करूना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होईल, असे स्पष्ट संकेत मंगळवारी मिळाले. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डी सी जी आय)परवानगी दिल्याच्या तारखेपासून दहा दिवसात लसीकरण मोहीम हाती घेण्यास केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावर्षीची संक्रांत आत्ता कोरोना वर यावी, अशीच सगळ्यांची प्रार्थना असून 'तिळगुळ घ्या.... आणि लस पण घ्या,' असेच या संक्रांतीला म्हणावे लागणार आहे.

' सिरम 'ची ' को व्हॅक्सिन 'या दोन लसिना तीन जानेवारी रोजी ' डीसीजीआय ने ' परवानगी दिली.त्यानंतरच्या दहा दिवसात केंद्राने लसीकरण सुरू करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केल्याने हा मुहूर्त संक्रांतीचा निघतो. 13 किंवा 14 जानेवारी पासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू होईल.देशभरात निवडक शहरांमध्ये घेतलेल्या रंगीत तालमीतून हाती आलेल्या तपशिलानं तर केंद्राने हा मुहूर्त निवडला.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी लसीकरण मोहिमेचा सज्जतेची ही माहिती देत सांगितले की, करोना लसित चे दोष साठवण्यासाठी करनाल , मुंबई, चेन्नई आणि कोलकत्ता या चार ठिकाणी प्रमुख शीतगृहे उभारली असून,याशिवाय देशभरात 37 ठिकाणी व्हॅक्सिंन स्टोअर्स देखील सज्ज आहेत. तेथूनच भाऊ प्रमाणात लसीचे वितरण केले जाईल.

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातही करोना लसीकरण मोहीम सुरू होऊ घातली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दै.' पुढारी ' ला सांगितले की,केंद्र सरकार देईल त्याच वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातही लसीकरण सुरू होईल.महाराष्ट्राचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले,करुणा च्या सर्व लसी केंद्रा कडूनच मिळणार असल्याचे केंद्राने निश्चित केलेल्या तारखा नाच लसी हाती पडतील आणि लगेचच लसीकरण सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी आठवडाभरात लसीकरण सुरू करण्याची पूर्ण तयारी झाल्याचे स्पष्ट केले. 14 तारखेला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 13 जानेवारी रोजी मोहिमेतील पहिला डोस दिला जाणार आहे. हवाईमार्गाने लसीची वाहतूक केली जाणार आहे. विशेष म्हणजे,लसीकरण मोहीम डिजिटल नियंत्रणात होणार आहे आणि लसीकरणाच्या सामग्रीवर तापमान नियंत्रक कही असणार आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य खात्याच्या आणि आरोग्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना लस टोचली जाईल. दुसऱ्या टप्प्यात करुणा च्या आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजे, पोलीस आणि विविध यंत्रणा चे कर्मचारी लस टोचून घेतील.तिसऱ्या टप्प्यात वय वर्ष 50 च्या पुढील नागरिकांना खास मेसेज पाठवून लस टोचून घेण्यासाठी बोलावले जाईल. आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस आदी फ्रन्टलाइन वर्कर्स ना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन ची आवश्यकता नाही,असेही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केल्याने रजिस्टेशन वरून होऊ घातलेला गोंधळ आधीच मिटला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा डेटा आधीच ' को-विन व्हॅक्सिं न डिलेवरी मॅनेजमेंट सिस्टीम ' मध्ये भरून घेण्यात आलेला असल्याने रजिस्टेशन ची गरज नाही, असेही भूषण यांनी सांगितले 

Corona vaccine

-------------------------------------------------------------------------------------

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !