कुस्तीच्या आखाड्यात अनुष्काचा ‘सुवर्ण’ डाव! राज्यात प्रथम क्रमांक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

वय अवघे १४ वर्षे; जिद्द मात्र मोठी! वाईच्या कन्येची राष्ट्रीय स्तराकडे दमदार झेप, ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न उराशी

Wrestling competitions, Anushka Mayur Chauhan, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (शुभम कोदे)

कुस्तीच्या  आखाड्यात प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्याची जिद्द आणि डोळ्यांत ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न... या जिद्दीच्या जोरावर वाईच्या अनुष्का मयूर चव्हाण हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अवघ्या १४ वर्षांच्या अनुष्काने ५७ किलो वजनी गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवित वाईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आता तिची निवड उज्जैन (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून, तिच्या यशाकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राचा मानबिंदू लोकमत क्लब कराड आणि जिल्हास्तरीय कुस्तीगीर संघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत सखी व जिजाऊ केसरी २०२६’ या राज्यस्तरीय स्पर्धेत अनुष्काने ही उल्लेखनीय कामगिरी केली. ताकद, डावपेच आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.

वाई हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणारी अनुष्का शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत कुस्तीचे धडे गिरवत आहे. वाई येथील जय हनुमान कुस्ती केंद्रात वस्ताद आबा डोंगरे, गणेश सणस आणि प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा नियमित सराव सुरू आहे. आखाड्यातील कठोर मेहनत, सरावातील सातत्य आणि जिंकण्याची जिद्द यांचेच फलित म्हणून तिने राज्यस्तरावर यशाचा झेंडा फडकवला.

अनुष्काच्या यशामागे तिच्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. वडील मयूर चव्हाण (माजी सरपंच, एकसर) यांच्यासह संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र, अनुष्काची स्वप्ने राज्यस्तरीय यशावर थांबणारी नाहीत. देशाचे प्रतिनिधित्व करून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी व्हायचे आणि भारतासाठी पदक जिंकायचे, हे तिचे ध्येय आहे. राष्ट्रीय स्पर्धेची संधी ही त्या दिशेने टाकलेले तिचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खा. नितीन पाटील, वाई पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, गावचे सरपंच व उपसरपंच, एकसर गावच्या मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे, गुरुनाथ राठोड, त. ल. जोशी वाई विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले. तसेच राष्ट्रीय स्पर्धेसह पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आखाड्यातील प्रत्येक डावातून आत्मविश्वास वाढवत अनुष्का आता राष्ट्रीय स्तरावर नशीब आजमावणार आहे. तिच्या या यशाने ग्रामीण भागातील मुलींसमोर नवे आदर्श उदाहरण उभे केले असून, वाईच्या या लेकीची कुस्तीतील भरारी भविष्यात ऑलिम्पिकच्या आखाड्यापर्यंत पोहोचणार का, याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !