पंढरपुरात साहित्य क्षेत्रातील मनाचा पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा उदय परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, पंढरपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक आणि कीर्तनकार ह.भ.प.सूर्याजी महाराज भोसले यांच्या कालाभूल या पुस्तकाला नुकताच प्रदान करण्यात आला. प्रकाशित पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात पहिले पाऊल टाकणाऱ्या साहित्यिकांना हा पुरस्कार देण्यात करण्यात येतो.
मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखा अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मंचावरील सर्व मान्यवरांनी परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या कामाचे कौतुक केले. साहित्यासाठी सचिन कुलकर्णी आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांचे काम कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले
ॲड. उमाकांत आदमाने यांनी सुत्रसंचलन केले तर विश्वविक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला महाराष्ट्रातील विविध भागांतून साहित्यिक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










