श्री क्षेत्र पंढरपूर येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचा उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
मराठी साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव करण्यासाठी 'परिमल सांस्कृतिक व्यासपीठ' यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित राज्यस्तरीय 'परिमल साहित्य पुरस्कार' (वर्ष २०२६) साठी लेखक आणि प्रकाशकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून, साहित्यिकांनी आणि प्रकाशकांनी ३१ जानेवारी २०२७ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्कारांच्या विविध श्रेणीमराठी साहित्यातील विविध साहित्यकृतींचा सन्मान करण्यासाठी एकूण सहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत:काव्य परिमल: १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांसाठी.कथा परिमल: नमूद कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रहांसाठी.साहित्य परिमल: कविता आणि कथा वगळता इतर सर्व प्रकारच्या पुस्तकांसाठी (कादंबरी, ललित लेख, वैचारिक, चरित्र, प्रवास वर्णन, इ.).उदय परिमल: कोणत्याही साहित्य प्रकारातील लेखकांच्या पहिल्या पुस्तकासाठी (पहिले प्रकाशित पुस्तक)शब्द परिमल: साहित्य चळवळीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांसाठी.जीवन परिमल: आयुष्यभर समर्पित भावनेने साहित्य सेवा करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांसाठी.
प्रस्ताव सादर करण्याचे नियम व निकष
पहिले चार विभाग (काव्य, कथा, साहित्य आणि उदय परिमल): या श्रेणींसाठी इच्छुक साहित्यिकांनी किंवा प्रकाशकांनी आपल्या प्रकाशित पुस्तकांच्या २ प्रती, साहित्यिकाचे २ पासपोर्ट साईज फोटो, पुस्तकाच्या प्रस्तावासोबत श्रेणीचा स्पष्ट उल्लेख आणि स्वतःचा अल्प परिचय एका स्वतंत्र कागदावर लिहून पाठवणे बंधनकारक आहे.
शेवटचे दोन विभाग (शब्द आणि जीवन परिमल): या पुरस्कारांसाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेने केलेल्या साहित्य सेवेचा सविस्तर/थोडक्यात अहवाल, दोन पासपोर्ट साईज फोटो आणि प्रस्ताव स्वतंत्र कागदावर लिहून पाठवणे आवश्यक आहे.
स्वीकृतीची अंतिम मुदत
सर्व, पात्र प्रस्ताव ३१ जानेवारी २०२७ पर्यंत खालील पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संबंधित विजेत्या साहित्यिकांना कळविण्यात येईल आणि मान्यवरांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
पुरस्काराचे स्वरूप
मान, सन्मान आणि आदराचे प्रतीक म्हणून विजेत्यांना मानाची शाल, दर्जेदार पुस्तकांचा संच आणि आकर्षक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
प्रस्ताव पाठवण्याचा पत्ता व संपर्क:
संपर्क व्यक्ती: सौ. मनीषा कुलकर्णी (प्रकाशिका, निषाद प्रकाशन, पंढरपूर)
पत्ता: कंगराळी मठ, मुक्ताई लॉज शेजारी, उंच विठोबा मागे, भक्ती मार्ग, पंढरपूर.
भ्रमणध्वनी क्रमांक: ८६२३०६७७१५ / ९०९६२५१२११
मराठी साहित्यविश्वातील लेखक, कवी व प्रकाशकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवाव्यात, असे आवाहन परिमल सांस्कृतिक व्यासपीठचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी व निषाद प्रकाशनच्या मनिषा कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











