आमदार समाधान आवताडे यांच्या मातोश्री पार्वतीबाई आवताडे यांना शिवशाही महारत्न आदर्श माता पुरस्कार - आमदार समाधान आवताडे भावूक

विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान

shivshahi maharatna puraskar, parvati autade, mla samadhan autade, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 'शिवशाही न्यूज' नेटवर्कचा चौथा वर्धापन दिन अत्यंत भव्यदिव्य आणि दिमाखदार स्वरूपात पार पडला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींना 'शिवशाही महारत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवारी या होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या शुभहस्ते झाले.

पार्वतीबाई आवताडे यांना 'शिवशाही महारत्न आदर्श माता पुरस्कार'
या सोहळ्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मातोश्री पार्वती महादेव अवताडे यांना 'शिवशाही महारत्न आदर्श माता पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, मुलांवर योग्य संस्कारांची शिदोरी देऊन त्यांना यशस्वी राजकारणी आणि उद्योजक म्हणून घडवण्यात पार्वतीबाईंचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या याच अपार कष्टाचा व मातृत्वाचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला.

आमदार समाधान आवताडे भावनिक 
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावनिक होत आमदार समाधान आवताडे म्हणाले, "शिवशाही न्यूजने महाराष्ट्रातील गुणवंतांचा सन्मान माझ्या मतदारसंघात श्री पांडुरंगाच्या प्रांगणात केला ही मोठी गोष्ट आहे. तर माझ्याच हस्ते माझ्या आईला 'आदर्श माता पुरस्कार' देऊन गौरव केला, ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे."

मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यात प्रामुख्याने चंदाताई तिवारी (राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या भारुड सम्राज्ञी), समाधान अवताडे (आमदार, पंढरपूर-मंगळवेढा), मंगेश चिवटे (विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे), प्रशांत डगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर), डॉ. प्रणिता भालके (नगराध्यक्ष, पंढरपूर), डॉ. सुनिता पोटे (नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती, शिरूर नगरपालिका), ऋतुजा मोरे (माजी जिल्हा परिषद सदस्य), महेश साठे (शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख), दिलीप धोत्रे (मनसे नेते), सतीश सावंत (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ), महबूब सय्यद (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मनसे), रवींद्र सानप ('आम्ही शिरूरकर' फाउंडेशन), आनंद पाटील (आमदार अभिजीत पाटील यांचे बंधू), नितीन सरडे (युवा नेते), गौरी खिस्ते (योगशिक्षिका) तसेच 'शिवशाही न्यूज'चे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी आणि कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी यांच्यासह आमदार समाधान आवताडे यांचे संपूर्ण कुटुंब – सुविद्य पत्नी अंजलीताई अवताडे, वहिनी सुकेशिनी संजय आवताडे, बहिणी सुनीता नवनाथ पवार व संगीता मनोजकुमार यादव, आणि पुतण्या वैष्णवी व आदिती आवताडे उपस्थित होत्या.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा वर्धापन दिन सोहळा राज्यभरात विशेष चर्चेचा विषय ठरला.

-----------------

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------


Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !