सभासद व बिगर सभासदांना अडचण होऊ नये यासाठी संचालक मंडळाचा निर्णय
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - किसन वीर व खंडाळा साखर कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना दिवाळीनिमित्त साखर वाटपाचा निर्णय झालेला होता. त्याप्रमाणे साखर वाटपाची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर होती. परंतु, नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार काही सभासदांना अडचणीस्तव साखर उचलता आलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव १४ नोव्हेंबरपर्यत मुदतवाद देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
प्रमोद शिंदे पुढे म्हणाले की, नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या सुनियोजित मार्गदर्शनाखाली किसन वीर व खंडाळा कारखान्याचे गाळप व्यवस्थितपणे सुरू असुन को- जन व डिस्टीलरी प्रकल्पाचे उत्पादनही सुरू झालेले आहे. मकरंदआबांनी जाहिर केल्याप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांना अडचण होऊ नये, याकरिता त्यांना सोईच्या ठिकाणी साखर वाटपाचे नियोजन ७ नोव्हेंबरअखेर सुरू करण्यात आलेले होते.
परंतु सभासदांच्य आग्रहास्तव काहींना काही अडचणींमुळे साखर उचलता आलेली नव्हती, त्यामुळे साखर वाटपास मुदत वाढ द्यावी, अशी विनंती करण्यात आलेली होती. ज्या सभासद व बिगर सभासदांनी अद्यापही आपली दिवाळीची साखर नेहली नाही, त्यांच्याकरिता गुरूवार १२ नोव्हेंबर ते शनिवार १४ नोव्हेंबरअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे. ज्या सभासदांची साखर अद्यापही राहिलेली आहे, त्या सर्वांनी आपली साखर किसन वीर व खंडाळा साखर कारखाना कार्यस्थळावरून कारखाना वेळेत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
तसेच ऊस उत्पादकांनीही क्षणिक भुलथापांना बळी न पडता आपल संपुर्ण परिपक्व झालेला ऊस किसन वीर व खंडाळा साखर कारखान्यास गाळपासाठी घालण्याचे आवाहनही नामदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संचालक मंडळाच्यावतीने प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











