वाईत १३ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या हँडबॉल स्पर्धा

हँडबॉल असोसिएशन सातारा आणि ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
Sports, Girls handball competition, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे) 
हँडबॉल असोसिएशन सातारा आणि ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शुक्रवार, दि. १३ ते रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर पार पडणार आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सहभागी होणाऱ्या खेळाडू संघांसह शिक्षक, पंच व पदाधिकाऱ्यांच्या निवास, भोजन तसेच क्रीडांगणासह अन्य सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्हा हँडबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यावेळी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव बाळकृष्ण पवार, प्राचार्या शुभांगी पवार, क्रीडा शिक्षक तसेच जिल्हा सचिव सचिन लेंभे, असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेमुळे वाईच्या क्रीडा क्षेत्राला राज्यस्तरावर नवी ओळख मिळणार असून युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !