विसर्जन मिरवणुकीदरम्यान हिंसाचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (अनिल सुर्यवंशी)
वैजापूर शहरात गणेशोत्सव-२०२६ विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये झालेल्या वादातून उद्भवलेल्या हिंसाचार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी यशप्राप्ती केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण १६ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकी काय आहे घटना?
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमधील वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले होते. या हाणामारीत रोहित पठारे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक ७०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध गंभीर कलमे तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम (Atrocity Act) १९८९ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परजिल्ह्यातून ६ आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व वैजापूर पोलिसांची ५ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंतरजिल्ह्यात लपून बसलेल्या आणखी ०६ फरार आरोपींना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी बेड्या ठोकल्या.
अटक करण्यात आलेले नवीन आरोपी (सर्व रा. वैजापूर):१) अविनाश उर्फ अनिकेत पोपट होंड२) ज्ञानेश्वर सिताराम वडाळकर३) प्रतीक कैलास साळुंके४) रोहित मच्छिंद्र आहेर५) संकेत आदिनाथ आहेर६) तुषार आदिनाथ आहेर(तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.)
आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक
यापूर्वी खून प्रकरणात ८ आरोपींना, तर वैजापूर पोलीस ठाण्यातील गु.नं. ६९८/२०२६ मध्ये २ आरोपींना असे एकूण १० जणांना अटक करण्यात आली होती. आता नव्याने ६ आरोपींना अटक झाल्याने या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची संख्या १६ वर पोहोचली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची शोध पथके अद्यापही कार्यरत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्नीहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, प्रभारी अधिकारी (पो.स्टे. वैजापूर) विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पो.नि. सत्यजित ताईतवाले, सपोनि. वैभव रणखांब, सपोनि. विठ्ठल झांजुर्णे, पो.उप.नि. लहुजी घोडे, तसेच अंमलदार भारत निकाळजे, रामेश्वर ढाकणे व युवराज पाडळे यांच्या पथकाने पार पाडली.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











