वाढदिवशी सामाजिक बांधिलकी! शिंदेवाडीत श्रीलेखा पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गौरव

तालुक्यात अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
birthday shrilekha patil, shriram shikshan sanstha, paniv, malshiras, solapur, shivshahi news,

​शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (राहुल तनपुरे)
वाढदिवस हा केवळ सत्कारापुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी काहीतरी देण्याची संधी ठरू शकतो, याचा वस्तूपाठ माळशिरस तालुक्यात पाहायला मिळाला. पंचायत समितीच्या माजी सदस्या, श्रीराम शिक्षण संस्थेच्या खजिनदार तथा माजी आमदार स्व. शामराव पाटील यांच्या स्नुषा आणि श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या धर्मपत्नी श्रीलेखा प्रकाश पाटील यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंदेवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

​माळशिरस तालुक्यात शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामस्थ आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग' परिवाराच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

​गुणवत्तेचा सन्मान अन् शिक्षणाला बळ
​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव व्हावा, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होऊन पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाला, तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

​शिक्षण व सामाजिक क्षेत्राशी घट्ट नाते
​श्रीलेखा प्रकाश पाटील यांचा सार्वजनिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राशी दीर्घकाळापासून जवळचा संबंध राहिला आहे. पंचायत समितीच्या माजी सदस्या म्हणून काम करताना त्यांनी जनसेवेचा ठसा उमटवला आहे. सध्या त्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या खजिनदार म्हणून शैक्षणिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

​माजी आमदार शामराव पाटील यांचा सामाजिक वारसा आणि श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पाटील परिवार नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रभागी असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शैक्षणिक उपक्रमांना बळ देणे हीच खरी वाढदिवसाची भेट असल्याचे मत या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले.

​परिसरातून कौतुकाचा वर्षाव
​आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि शिंदेवाडी ग्रामस्थांच्या पुढाकारामुळे या उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त झाले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारलेली ही कौतुकाची थाप परिसरातील इतर घटकांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, या उपक्रमाचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !