भुईंजच्या स्नुषेचा राष्ट्रीय स्तरावर डंका

डॉ. प्रतिभा भोसले यांना ‘मिसेस FABB इंडिया डिजिटल दिवा २०२६’ किताब; सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

The title of 'Mrs. Fab India Digital Diva 2026', Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी भुईंज गावाच्या स्नुषा डॉ. प्रतिभा स्वप्नील भोसले यांनी केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘Mrs. FABB India Digital Diva Award 2026’ हा किताब त्यांनी पटकावला असून, त्यांच्या या यशामुळे भुईंजसह सातारा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उषाताई प्रकाश भालेराव यांच्या कन्या आणि भुईंज ता. वाई  व सातारा जिल्ह्याच्या स्नुषा असलेल्या डॉ. प्रतिभा स्वप्नील भोसले यांनी देशभरातील विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या प्रतिभावान महिलांमध्ये आपल्या आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली. लोकमतदानातून सर्वाधिक मते मिळवत त्यांनी ‘डिजिटल दिवा २०२६’ हा मानाचा किताब आपल्या नावे केला. त्यांच्या लोकप्रियतेची आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

उच्चपदस्थ जबाबदारीसह स्वप्नांनाही भरारी!
डॉ. प्रतिभा भोसले या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे डायरेक्टर पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दोन जुळ्या मुलांची आई म्हणून मातृत्वाची जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी आपले व्यावसायिक क्षेत्र आणि वैयक्तिक स्वप्ने यांचाही समतोल साधला आहे. कुटुंब, करिअर आणि स्वतःच्या आवडी-निवडी यांची सांगड घालत त्यांनी मिळवलेले यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

‘डिजिटल दिवा’ हा किताब केवळ लोकप्रियतेचा सन्मान नसून आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या क्षमतेचा गौरव मानला जातो. डॉ. भोसले यांनी या यशातून महिलांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

'स्वप्नांना वय नसते’ हा संदेश
आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाही स्वतःची स्वप्ने जपता येतात आणि जिद्द, मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर ती पूर्ण करता येतात, हा संदेश डॉ. प्रतिभा भोसले यांच्या यशस्वी प्रवासातून मिळतो. त्यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील गौरवामुळे भुईंज गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !