भेटीमुळे कराड परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. जयंतराव आसगांवकर यांनी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा लोकशाही आघाडीचे अध्यक्ष, नगरसेवक जयंत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती आ. आसगांवकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली. या भेटीमुळे कराड परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अल्ताफहुसेन मुल्ला, पंचायत समिती सदस्य रवींद्र बडेकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महंमद आवटे, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुलराज पवार, सत्यजित ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले, नगरसेवक जयंत बेडेकर, नगरसेवक दाऊदभाई आंबेकरी, कराड तालुका युवक अध्यक्ष देवदास माने, उपाध्यक्ष प्रतीक निकम, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष दिग्विजय जमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीकडे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











