संस्थेचा दांडगा वारसा, आंदोलनातील प्रत्यक्ष सहभाग आणि प्रशासकीय अनुभव - कौस्तुभ गावडे यांच्या प्रभावी कार्यशैलीचा वेध
शिवशाही वृत्तसेवा, (संपादक सचिन कुलकर्णी)
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी १९५४ मध्ये रोवलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे रोपटे आज एक विशाल वटवृक्ष झाले आहे. १३ जिल्ह्यांतील ४१२ हून अधिक शाखा, १०,५०० शिक्षक आणि लाखो विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक परिवारात मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि शिक्षक म्हणून काम करताना श्री. कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची जवळून उकल केली आहे. पुणे विभागातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयांतील ८,००० हून अधिक शिक्षकांच्या विविध अडचणी केवळ कागदावर न ठेवता, त्या प्रत्यक्ष सोडवण्यासाठी ते सातत्याने अग्रभागी राहिले आहेत.
शिक्षक म्हणून प्रत्यक्ष काम करत असताना प्रशासकीय धोरणांचा अभ्यास, प्रत्यक्ष अनुभव, व्यापक संपर्क आणि संघर्षाची तयारी या चार सूत्रांच्या बळावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी ते केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत:
पेन्शन लढा: १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीच्या निर्धार मेळाव्यात प्रत्यक्ष पाठिंबा.
आंदोलनातील सहभाग: कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या कोल्हापुरातील धरणे आंदोलनापासून ते ९ जुलै २०२६ च्या जिल्हा परिषद कोल्हापूर येथील भव्य मोर्चात सक्रिय सहभाग.
धोरणात्मक विरोध: सांगलीतील TET सक्तीविरोधातील मूक मोर्चा आणि संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या निकषांविरोधात उपसंचालक कार्यालयासमोर दिलेले धरणे आंदोलन.
आज जुनी पेन्शन, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र पोर्टल भरती, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन आणि अशैक्षणिक कामांचा ताण यांमुळे शिक्षक वर्ग अडचणीत आहे. या प्रश्नांची सखोल जाण असलेल्या आणि शासनस्तरावर ते मांडण्याची धमक असलेल्या अभ्यासू नेतृत्वाची आज शिक्षण क्षेत्राला गरज आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असली, तरी शिक्षकांशी असलेला थेट संवाद, मतदार नोंदणीतील आघाडी, संस्थात्मक पाठबळ आणि थेट आंदोलनातील सहभाग यांमुळे कौस्तुभ गावडे यांची दावेदारी अत्यंत प्रबळ मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांसारख्या प्रमुख नेत्यांचे पाठबळ तसेच पक्षांतर्गत सकारात्मक वातावरणामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात आहे. ज्ञानपरंपरेचा वारसा जपत शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा हा तरुण व अभ्यासू चेहरा आगामी निवडणुकीत निर्णायक ठरेल, यात शंका नाही.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











