वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाई तालुका काँग्रेस कमिटीचे प्रशासनाला निवेदन
Declare wai taluka as drought affected, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

पावसाअभावी वाई तालुक्यातील शेती संकटात सापडली असून, उभी पिके करपून गेली आहेत. विहिरींमधील पाण्याची पातळीही तळाला गेल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाही शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वाई तालुक्याला वगळण्यात आल्याने, वाई तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी जोरदार मागणी वाई तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.

वाई तालुक्यात धोमसारखे मोठे धरण असतानाही तालुक्यातील शेतकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची खंत काँग्रेस कमिटीने व्यक्त केली आहे. धरणातील पाणी खंडाळा, फलटण, बारामती आणि कोरेगाव या भागांकडे जात असताना, वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे कमिटीने निवेदनात नमूद केले आहे.

पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून, विहिरींनीही तळ गाठल्याने शेती करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत वाई तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश न करणे हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय असल्याची भूमिका वाई तालुका काँग्रेस कमिटीने घेतली आहे. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा आणि बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

     या मागणीसाठी ७ ऑक्टोबर रोजी वाईचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पिसाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयदीप शिंदे, सातारा जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष प्रताप देशमुख, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, शरद पनवेलकर, प्रकाश शिंदे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर, सेवा दलाचे अध्यक्ष काशिनाथ पिसाळ, उपाध्यक्ष नामदेवराव दौंड, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष संभाजी कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंतदादा पिसाळ, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजिंक्य देशमुख, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विहार पावस्कर, धनंजय पिसाळ, संभाजी पिसाळ, संतोष गायकवाड, वाई विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

वाई तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून तालुक्याचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक त्या सवलती व मदत द्यावी, अशी मागणी यावेळी वाई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !