अकोट येथे - भगवान बिरसा कला संगम २०२६ - 2/0 उत्साहात संपन्न

आदिवासी पारंपरिक समूह नृत्य व गायन स्पर्धेतून लोकसंस्कृतीचे दर्शन
Bhagwan Birsa Kala Sangam 2026, Akola,Akot, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, अकोला प्रतिनिधी

आदिवासी कोरकू समाज विकास संघटना, ता अकोट जि, आकोला यांच्या वतीने आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ अंतर्गत आदिवासी पारंपरिक समूह नृत्य व गायन स्पर्धेची उपविभागीय फेरी शनिवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी राम नारायण लॉन, अकोट येथे उत्साहात संपन्न झाला या वेळी प्रमुख पावणे संजय कासदे
, श्रीकृष्ण ढीगर साहेब , हरीराम गुरूजी कासदे , डॉ, सुनिल कास्देकर , मौजीलाल मास्ककर साहेब , डीगांबर सोळंके ( वस्ताद ), उमेश पवार , हरिष टावरी , विठ्ठल मडावी , बिजेश गवते , दिलीप गवते , कुणाल कामळी साहेब , जितेश लांहगें , डॉ , मडावी साहेब , कास्देकर गुरूजी परतवाडा, खोटे साहेब लाभले,,.
या सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, लोककला, पारंपरिक नृत्य आणि गायन यांचे दर्शन घडले. स्पर्धेत सहभागी कलाकारांनी आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, पारंपरिक कला पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि समाजातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. आधुनिकतेच्या प्रवाहात आदिवासी समाजाची मूळ संस्कृती, परंपरा आणि लोककला टिकवून ठेवण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आदिवासी युवक-युवतींमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळून समाजाच्या सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी मिळते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी लोकसंस्कृतीचे संवर्धन आणि पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  स्वयसेवक हर्षद बेलसरे , अर्जुण कासदे , रमेश कासदे , मनिष ढीगर , महादेव कासदे , विजय पालवे , सुवाशिनी बेलसरे , नंदनी कासदे , आयोजकांनी परिश्रम घेतले.

आयोजक : जानराव बेलसरे , आदिवासी कोरकू समाज विकास संघटना, अकोट. तथा सर्व आदिवासी समाज बांधव होते‌.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !