जिल्हा परिषद शाळांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निर्णय

प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेला पूर्णविराम, रंगरंगोटी, स्वच्छतागृह व पाणीपुरवठ्याची कामे तत्काळ करण्यास मदत
Free funds for school maintenance, education minister Dada bhuse, Maharashtra, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
जिल्हा परिषद शाळांमधील किरकोळ दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि त्यासाठी प्रशासकीय मंजुरीच्या प्रदीर्घ प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी आता थेट मुख्याध्यापकांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेतील आवश्यक दुरुस्तीची कामे अधिक जलदगतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
शाळांमध्ये रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लहान-मोठ्या किरकोळ दुरुस्तीची कामे तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आवश्यक कामे अनेकदा निधी व प्रशासकीय मंजुरीअभावी प्रलंबित राहतात. या पार्श्वभूमीवर शाळांना उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून अशी कामे स्थानिक पातळीवर तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
या निधीचा वापर करताना शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रम ठरवावा, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. निधीचा योग्य व पारदर्शक वापर करून विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी वारंवार कार्यालयीन मंजुरीची प्रतीक्षा करण्याची गरज कमी होणार असून, शाळेच्या गरजेनुसार स्थानिक पातळीवर तातडीने निर्णय घेता येणार आहे. परिणामी, ‘गरज दिसली की दुरुस्ती’ या पद्धतीने शाळांमधील मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यास चालना मिळणार आहे.
मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने निधीचा विनियोग केल्यास जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !