अकलूजमध्ये भूजल परिस्थितीवर मंथन - दुष्काळी भागासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर

सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाची बैठक आणि चर्चासत्र
Meeting of the Central Ground Water Board, akluj, malshiras, solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी )
अकलूज - सोलापूर जिल्ह्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थिती, भूजल पातळी आणि जमिनीअंतर्गत उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेण्यासाठी अकलूज येथे महत्त्वपूर्ण चर्चासत्र व बैठक पार पडली. भारत सरकारच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड (CGWB), महाराष्ट्र रिजनचे ज्येष्ठ भूजल शास्त्रज्ञ डॉ. उपेंद्र धोंडे, सहवैज्ञानिक शुभांशू तिवारी आणि सहवैज्ञानिक पौर्णिमा बताटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील भूजलाची सद्यस्थिती, भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई, भूजल पुनर्भरणाच्या शक्यता तसेच जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः दुष्काळी भागातील भूजलसाठ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

भूजल पुनर्भरणासाठी ठोस नियोजनाची गरज
पावसाच्या पाण्याचे प्रभावी संधारण, भूजल पुनर्भरणासाठी आवश्यक संरचनांची उभारणी, उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत विचारविनिमय झाला. गावपातळीवर जलसंधारणाच्या कामांना शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सोलापूर जिल्हा व माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांनी समन्वयाने ठोस नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, हर्षदा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समिती सभापती दत्ता मगर, अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, हरिभाऊ मगर यांच्यासह तालुक्यातील कृषी, जलसंधारण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच जलसंसाधन क्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दुष्काळमुक्तीसाठी विभागीय समन्वयावर भर
भूजलाचा शाश्वत वापर, जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांचा समन्वय साधल्यास दुष्काळी परिस्थितीवर दीर्घकालीन मात करण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे उपलब्ध जलस्रोतांचे शास्त्रीय मूल्यमापन करून भविष्यातील पाणी नियोजनाला दिशा देण्याची गरज या बैठकीतून अधोरेखित झाली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !