बारामती हादरली! शेरेवाडीत मध्यरात्री दोन वृद्ध महिलांची निर्घृण हत्या - चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचा संशय - घराच्या ओसरीत झोपलेल्या लडकत कुटुंबातील दोन महिलांवर धारदार शस्त्राने वार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून गंभीर दखल आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे पोलिसांना निर्देश
Double murder case, two ladies killed, police, Baramati, Pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, बारामती
बारामती तालुक्यातील शेरेवाडी (बाबुर्डी) येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणाऱ्या घटनेत घरात व ओसरीत झोपलेल्या दोन वयोवृद्ध महिलांची अज्ञात हल्खोरांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. आज, मंगळवारी (ता. २९) भल्या पहाटे ही भीषण घटना उघडकीस आली असून, यामुळे शेरेवाडी परिसरासह संपूर्ण बारामती तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेरेवाडी येथील रहिवासी असलेल्या इंदुमती मारुती लडकत (वय ६५) व कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय ५०) या दोन्ही महिला नेहमीप्रमाणे घरासमोरील ओसरीत झोपलेल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने अथवा टोळीने घरात शिरण्याच्या उद्देशाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान बाहेर झोपलेल्या महिलांना जाग आल्याने किंवा त्यांना विरोध केल्याने हल्खोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक वार केले.

या हल्ल्यात इंदुमती लडकत यांच्या मानेवर शस्त्राने गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णाबाई लडकत यांच्यावरही वार करण्यात आल्याने त्यांचाही दुर्दैवी अंत झाला. सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांना खबर देण्यात आली.

चोरीच्या उद्देशाने हत्येचा प्राथमिक संशय
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून पंचनामा सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा संपूर्ण प्रकार घरफोडी किंवा चोरीच्या उद्देशातून घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागे इतर काही वैयक्तिक वा अन्य कारण आहे का? याचाही पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले असून महत्त्वपूर्ण पुरावे संकलित केले जात आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून गंभीर दखल
या दुहेरी हत्याकांडानंतर बारामतीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना सांगितले, "शेरेवाडीतील घटना अत्यंत दुःखद आणि सुन्न करणारी आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि तपासाच्या इतर घटकांचा वापर करून आरोपींचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल."
तसेच, मृत महिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत उपमुख्यमंत्री पवार यांनी लडकत कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा दडवली जाईल, असे आश्वासन दिले.

परिसरात भीतीचे वातावरण
एकाच रात्री दोन महिलांची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्यामुळे शेरेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. संशयित आरोपींना लवकरात लवकर अटक करून या हत्याकांडाचा उलगडा करावा, अशी तीव्र मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. पुढील अधिकृत तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !