DCC च्या राजकारणात मोठी खळबळ शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटील अन् रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात आज अज्ञातास्थळी खलबते? सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणे तापली

उदयनराजेंची भूमिका स्पष्ट, तर शंभूराज देसाई अन् जयकुमार गोरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत!
DCC Bank election, udayanraje Bhosle, Shivendra Raje Bhosle, makrand Patil, jaykumar Gore, ramrajya Nayak nimbalkar, shambhuraje Desai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून सहकार क्षेत्रात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. बँक निवडणुकीतील सत्तासमीकरणे जुळवण्यासाठी आणि पुढील राजकीय रणनीती आखण्यासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात आज दुपारी एका ‘अज्ञातस्थळी’ गुप्त बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीमुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पॅनल रचना आणि रणनीतीवर होणार चर्चा
डीसीसी बँकेवर सत्ता कायम राखण्यासाठी आणि विरोधी गटांची ताकद मोडून काढण्यासाठी या तीन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. निवडणुकीतील पॅनलची रचना कशी असावी, जागांचे वाटप कसे करावे आणि सहकारातील जुनी-नवी समीकरणे कशी जुळवून आणावीत, यावर या गुप्त बैठकीत खलबते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खा.उदयनराजेंची भूमिका स्पष्ट, पालकमंत्र्यांचे ‘मौन’
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली राजकीय भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अद्याप या निवडणुकीबाबत कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही नेते कोणती रणनीती आखतात, याकडेही सहकार क्षेत्राचे बारीक लक्ष आहे.

जिल्ह्याचे लक्ष एकाच बैठकीकडे
शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या तीन ताकदवर नेत्यांच्या एकत्र येण्याने सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळते? या बैठकीतून कोणते नवीन राजकीय समीकरण समोर येते? याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !