शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात दाखल - जिल्हा बँकेच्या निवडणुकीची कमान शिवेंद्रराजेंच्या हाती - निर्णयाकडे भाजपसह महायुतीतील नेत्यांचे लक्ष

उदयनराजेंच्या पक्षविरहित भूमिकेनंतर शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका ठरणार निर्णायक
dcc bank election, shivendra raje bhosale, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनामुळे गेल्या काही दिवसांपासून काहीशा थंडावलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.

शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात नसल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतच्या राजकीय घडामोडींना अपेक्षित वेग मिळत नव्हता. आता त्यांच्या आगमनानंतर पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा, संभाव्य पॅनेल आणि निवडणुकीची दिशा याबाबत खलबते होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेची निवडणूक पक्षविरहित पद्धतीने घेण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील चर्चेनंतर भाजपची नेमकी भूमिका काय राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे. दुसरीकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर होणार असल्याने पुढील काही दिवसांतील राजकीय चर्चा महत्त्वाच्या ठरणार आहेत.

महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही शिवेंद्रसिंहराजेंच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती भूमिका घेतली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात दाखल झाल्याने आता चर्चांना वेग, राजकीय भेटीगाठींना सुरुवात आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या समीकरणांना आकार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शिवेंद्रसिंहराजे कोणती भूमिका मांडतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने खलबतांना वेग
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निवडणुकीबाबतची अंतिम भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे.

उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे चर्चेनंतर काय ठरणार?
खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेची निवडणूक पक्षविरहित पद्धतीने घेण्याची भूमिका मांडली आहे. तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर भाजपची भूमिका काय ठरते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !