मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना प्रतीकात्मक बेड्या, सोलापुरात काँग्रेसचा एल्गार!

राजीनाम्याच्या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन
Protest against CEC dnyanesh kumar, MP praniti Shinde, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
केंद्रीय निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.

आंदोलनादरम्यान ज्ञानेश कुमार यांचा मुखवटा घालून एका कार्यकर्त्याच्या हातात प्रतीकात्मक बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका करत प्रणिती शिंदे यांनी ज्ञानेश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली.

निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवर भाष्य करताना खासदार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने देशपातळीवर आंदोलन छेडले असून, दिल्लीपाठोपाठ सोलापुरात झालेल्या या निदर्शनांमुळे केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील राजकीय संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !