शिवरूपराजेंचा पत्ता कापण्यासाठी रामराजेंची चाल?; कृषी प्रक्रिया मतदारसंघातून रामराजे नाईक निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज

‘डीसीसी’च्या निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग; दोन दिवसांत ३५७ अर्जांची विक्री, आज १६ उमेदवारांचे १८ नामनिर्देशन अर्ज दाखल.
DCC Bank Election 03, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा या बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होताच उमेदवारी अर्जांच्या विक्रीला आणि नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याला मोठा वेग आला आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण २०२ अर्जांची विक्री झाली होती. तर आज २८ सप्टेंबर रोजी तब्बल १५५ अर्जांची विक्री झाली. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ३५७ अर्जांची विक्री झाली आहे.
दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी एकूण ६ उमेदवारांचे ७ नामनिर्देशन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. आज २८ सप्टेंबर रोजी एकूण १६ उमेदवारांचे १८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष खंडाळा तालुका मतदारसंघातून  शामराव लक्ष्मणराव गाढवे यांनी अर्ज दाखल केला.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष फलटण तालुका मतदारसंघातून श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष पाटण तालुका मतदारसंघातून  सत्यजित विक्रमसिंह पाटणकर व  यासेन विक्रमसिंह पाटणकर यांनी अर्ज दाखल केले.
विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष कराड तालुका मतदारसंघातून  उदयसिंह विलासराव पाटील यांनी दोन अर्ज दाखल केले.
विजाभज राखीव प्रवर्गातून  शिवाजीराव शंकरराव शेळके पाटील व  लहुराज गणपती जाधव, तर इतर मागास वर्ग राखीव प्रवर्गातून  शंकर रामचंद्र माळवदे व  रज्जाक अब्दुल मुलानी यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था/पगारदार नोकऱ्यांच्या पतसंस्था मतदारसंघातून श्री मनोज भीमराव घोरपडे यांनी दोन अर्ज दाखल केले.
महिला राखीव प्रवर्गातून  सुरभी मदन भोसले,  शशिकला मुगुटराव जाधव (देशमुख) व सौ. प्रमिला चंद्रकांत कदम यांनी अर्ज दाखल केले. औद्योगिक व मजूर मतदारसंघातून  विक्रम जयसिंगराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मात्र, आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांचा कृषी प्रक्रिया मतदारसंघातून दाखल झालेला उमेदवारी अर्ज. या मतदारसंघातून श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी या मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने ‘डीसीसी’च्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिवरूपराजेंचा पत्ता कापण्यासाठी रामराजेंनी थेट मैदानात उतरण्याची ही रणनीती आहे का?, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
आता उर्वरित २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. निवडणूक कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी फक्त उमेदवार किंवा सूचक यांनीच नामनिर्देशन पत्र दाखल करावे. इतर सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी सांगितले आहे.
  रामराजेंच्या या उमेदवारीमुळे कृषी प्रक्रिया मतदारसंघातील समीकरणे नेमकी कोणत्या दिशेने वळतात आणि आगामी काळात कोणकोणत्या राजकीय हालचाली घडतात, याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
         -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !