राजाचे कुर्ले येथील महिलेच्या खुनाचा उलगडा - माळशिरस तालुक्यातील मांडवे येथील पती अटकेत.

१२ दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांना यश; शेकडो सीसीटीव्ही फुटेजची केली तपासणी
Bold police action, Solapur, malshiras, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)

खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथे अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यांचा सातारा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. तब्बल १२ दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजाचे कुर्ले येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृतदेहाची ओळख तसेच खुनामागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला. या तपासादरम्यान पोलिसांनी सातारा, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटक सीमावर्ती भागातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग १२ दिवस तपासले.
या तपासातून पोलिसांच्या हाती एका संशयास्पद वाहनाचा क्रमांक लागला. वाहनाच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी तपास पुढे नेला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात पोहोचले.
पोलिसांनी मांडवे (ता. माळशिरस) येथे छापा टाकून मृत महिलेचा पती राहुल संभाजी कोळी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याने चारित्र्याच्या संशयातून पत्नीला राजाचे कुर्ले येथे आणून तिचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला हा तपास सीसीटीव्ही फुटेज, संशयास्पद वाहन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचला. स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलिसांच्या पथकाने केलेल्या बारकाईच्या तपासामुळे या क्लिष्ट खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास औंध पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.
        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !