सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, ७ लाख ७० हजार रुपयांच्या २२ चोरीच्या बाईक्स जप्त

सराईत चोरट्यासह साथीदार जेरबंद! सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस
Bike thief arrested, police, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून, एका सराईत चोरट्याला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून चोरलेल्या तब्बल २२ मोटार सायकली (किंमत रु. ७,७०,०००/-) जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सोलापूर शहरासह पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अशी झाली कारवाई
जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना सराईत चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे कडक निर्देश दिले होते.

त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे व त्यांचे पथक अकलूज शहर परिसरात गस्तीवर असताना, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पेणूर (ता. मोहोळ) येथून मोटारसायकल चोरणारा सराईत गुन्हेगार नामदेव बबन चुनाडी (रा. अनिल नगर, पंढरपूर) हा नातेपुते येथे थांबला आहे. बातमी मिळताच पोलिसांनी तत्काळ नातेपुते गाठून आरोपी नामदेव चुनाडी याला ताब्यात घेतले.

कौशल्याने तपास अन् चोरीचा पर्दाफाश!
शुरुवातीला आरोपीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पेणूर येथून चोरी केलेली युनिकॉर्न मोटारसायकल गणेश उर्फ नाना साबळे (रा. राऊत नगर, अकलूज) याला विकल्याची कबुली दिली.
अधिक तपासात त्याने मोहोळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, सोलापूर शहर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या भागांतून विविध मॉडेलच्या दुचाकी चोरल्याचे उघड केले. चोरलेल्या सायकलींपैकी ४ सायकली तुषार अनिल चव्हाण (रा. अकलूज) याला दिल्या होत्या, तर उर्वरित १७ सायकली त्याने स्वतःकडे ठेवल्या होत्या. पोलिसांनी आरोपींकडून सर्व २२ मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

विविध पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस
जप्त केलेल्या सायकलींची पडताळणी केली असता खालील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत:
सोलापूर जिल्हा: मोहोळ पो. ठाणे (२ गुन्हे), अक्कलकोट उत्तर, टेंभुर्णी, जोडभावी पेठ (सोलापूर शहर)
पुणे जिल्हा: बारामती तालुका, वाघोली, पौड, सासवड, शिक्रापूर, बावधन
अहिल्यानगर: तोफखाना पो. ठाणे (२ गुन्हे)
सांगली जिल्हा: विटा, कासेगाव पो. ठाणे
सातारा व नाशिक: कराड शहर, सरकारवाडा (नाशिक शहर)
(इतर ५ वाहनांबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.)

तपास पथक
ही उल्लेखनीय आणि धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे, पंढरपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस अंमलदार रवी माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, महिला पोलीस अंमलदार सुनंदा झळके, अन्वर अत्तार, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, सागर ढोरेपाटील व चालक पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या यशस्वी कामगिरीबद्दल संपूर्ण तपास पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !