मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि मंत्री मकरंद पाटील भेटले - डीसीसी बँकेच्या राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग

पॅनलच्या व्यूहरचनेवर बंददाराआड खलबतं - डीसीसी बँकेच्या रणसंग्रामाचे चित्र लवकरच होणार स्पष्ट
DCC Bank election, minister makrand Patil, minister shivendra Raje Bhosale, satara, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची एका ठिकाणी झालेली महत्वपूर्ण भेट  राजकीय  वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे जिल्हा बँकेच्या सत्ता संघर्षात पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात असून, संभाव्य पॅनलच्या रचनेबाबतही खलबते झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि वाढलेल्या हालचालींमुळे आगामी काळात कोणत्या नेत्यांची कोणती भूमिका राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांच्या बैठका आणि चर्चांमधून पॅनलची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !