सिंहगड पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन विभागात डेटा कम्युनिकेशनमधील नेटवर्किंग उपकरणे व प्रोटोकॉल वर कार्यशाळा संपन्न

संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांचे मार्गदर्शन
Workshop at Sinhagad College, data communication networking, Dr. Subhash pingale, pandharpur, Solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे अंतिम वर्षाच्या  अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी “Networking Devices & Protocols for Data Communication” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत राउटर, स्विच, नेटवर्किंग उपकरणे, डेटा कम्युनिकेशनमधील विविध प्रोटोकॉल, नेटवर्कची रचना तसेच आधुनिक संगणक नेटवर्कमध्ये या उपकरणांची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नेटवर्किंग क्षेत्रातील संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आल्या.

E&TC शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डेटा कम्युनिकेशन व नेटवर्किंग क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानासोबतच औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची ओळख झाली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद  कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

 कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. भालचंद्र गोडबोले , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. 

“Learn, Explore, Build a Stronger Network” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या नेटवर्किंगविषयक ज्ञानाला व्यावहारिक व तांत्रिक दृष्टिकोनाची जोड मिळाली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !