प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या प्रवेशाचा पहिला कॅप राऊंड दिनांक २३ सप्टेंबर २०२६ पासून सुरु

दिनांक २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणार प्रक्रिया
B pharmacy admission process, first cap round, sveri, Pandharpur, Solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित बी. फार्मसी (डिग्री) महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेची पहिली फेरी (फर्स्ट राऊंड) बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२६ पासून सुरु होणार असून ती शुक्रवार , दि.२५ सप्टेंबर रोजी  सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. स्वेरीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६३९७) मध्ये कॅप राउंडचे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे तसेच  महाविद्यालयात या कोर्ससाठी ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे.' अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

सन २०२६-२७ च्या पदवी फार्मसी अर्थात बी. फार्मसी प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज तपासणी, पडताळणी आणि निश्चिती आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर आता येत्या बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६  पासून ते शुक्रवार, दि.२५ सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची पहिली फेरी (कॅप राउंड-१) चालणार आहे. यामध्ये आपल्याला योग्य महाविद्यालयाची निवड करावी लागणार आहे. यासाठी विशेष अभ्यास करून कॅप राऊंड १ चे ऑप्शन फॉर्म ऑनलाइन भरावेत. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल, सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या चार दिवसांत घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीचा लाभ घेता येणार आहे. बी.फार्मसी प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर रविवार दि.२७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 

पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्विकृती आणि निश्चिती ही सोमवार, दि.२८ सप्टेंबर ते  बुधवार, दि.३० सप्टेंबर या दरम्यान करता येणार आहे. प्रथम वर्ष बी.फार्मसीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अ‍ॅडमिशन इन्चार्ज डॉ. वृणाल मोरे (मोबा.क्र. ९६६५१९६६६६), प्रा. आर. एस. नाईकनवरे- ८३९०९०६१४६, प्रा. एल. एन. पाटील- ७०३८७८३११ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली  व प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली अभ्यासू शिक्षकांच्या सहकार्याने  प्रवेश यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !