स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांनी दिली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूळ गावी भेट

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाला समतेचा संदेश दिला - डॉ. बी. पी. रोंगे 
Karmaveer Bhaurao Patil, native place, dr.B.P. ronge, sveri, sangali, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (मनिषा कुलकर्णी)
'शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजाला समतेची शिकवण दिली. कर्मवीरांच्या आयुष्याचा पूर्वार्ध हा शाहू महाराजांच्या सामाजिक समतेचा विचार जवळून पाहण्यात गेला. त्यामुळे त्या विचारांचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला होता.' असे प्रतिपादन गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.

पुणे विभाग शिक्षण मतदानाच्या पार्श्वभूमीवर डॉ.रोंगे सर हे कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना भेटी देत आहेत. त्यानिमित्ताने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉ. रोंगे सर यांनी भेट दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जन्मस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज हे आहे, तर सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे डॉ. रोंगे यांनी मूळ गावी जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन केले. यावेळी डॉ. रोंगे सर हे त्यांच्या जीवनातील पैलू उलगडून दाखवत होते. 

यावेळी त्यांच्या सोबत सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य जयराज पाटील, ऐतवडे बुद्रुक मधील राजाराम बॅंकेचे संचालक शहाजी गायकवाड, सहशिक्षक संभाजी गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक आनंदा गायकवाड आदी सोबत होते. पुढे डॉ. रोंगे यांनी तेथील शिक्षकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. डॉ. रोंगे सरांच्या भेटीला सांगली जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचेही या निमित्ताने जाणवले. डॉ. रोंगे पुढे म्हणाले की 'कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराजांविषयी म्हणतात की, मी त्यांच्याकडे दोन दृष्टीने पाहतो, एक राज्यकर्ते म्हणून, तर दुसरे दीनोद्धारक म्हणून. मी त्यांच्या दुसऱ्या दृष्टीचा उपासक आहे. याचाच अर्थ असा की कर्मवीर भाऊराव पाटील यांना सामाजिक समतेची दृष्टी शाहू महाराजांकडून लाभलेली होती. म्हणूनच त्यांच्या शालेय वयापासून त्यांनी सोवळे घालून जेवण करणे, जातीच्या अभिमानातून स्वतःला वेगळे समजणे या बाबतीत बंड केलेले होते. एकुणच स्वतःच्या आयुष्यात त्यांनी समतेचा विचार आत्मसात केलेला होता.

सत्यशोधक समाजाची समतेची विचारसरणी प्रत्यक्षात कार्यवाहीत आणण्यासाठी कर्मवीरांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये मागासलेल्या समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, गरीब विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण देणे, वेगवेगळ्या जातीतील विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण करणे, स्वावलंबी आणि चारित्र्यवान पिढी तयार करणे आदी कार्य केले. याचाच अर्थ असा की, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या समतेचा विचार अजरामर केला.' एवढे सांगून डॉ. रोंगे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रत्येक शिक्षकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेणे हे त्यांचे कार्य मागील ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असल्यामुळे ऐन जयंतीदिनी डॉ.रोंगे सरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूळ गावी भेट देऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहिली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !