शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश, मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मदिनानिमित्त एकसर येथे सफरचंदाच्या रोपांची लागवड
Shahir Sable jayanti, birth anniversary,tree plantation, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्राचे सुपुत्र, पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून एकसर येथे शाहीर साबळे प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या परिसरात सफरचंदाच्या झाडांची लागवड करून शाहीर साबळे यांच्या स्मृतींना पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

शाहीर साबळे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेला नवी ओळख मिळवून देतानाच, समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या वृक्षारोपण उपक्रमातून त्यांच्या विचारांना आणि सामाजिक बांधिलकीला कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष चावरे, आर्किटेक्ट रवी गद्रे, अभियंता प्रशांत माने , मुख्य विश्वस्थ राधाबाई साबळे, अध्यक्ष राजाराम निकम, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर सचिव संजय साबळे,  कोषाध्यक्ष श्रीधर जगताप, संचालक नारायण वरे, जनसंपर्क अधिकारी  अशोक इथापे, उद्योजक बाबा जाधव, राजेंद्र भिलारे, संपत वरे, संदीप आंबवले, ईश्वर तरडे , प्रकाश साबळे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व मान्यवर उपस्थित होते.

शाहीर साबळे यांच्या जन्मभूमीत त्यांच्या स्मृती जपण्यासोबतच परिसर हिरवाईने नटविण्याचा हा उपक्रम आगामी काळातही पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शाहीरांच्या विचारांचा वारसा आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम या वृक्षारोपण कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

शाहीर साबळे यांच्या जन्मभूमीत उभारण्यात येणाऱ्या स्मारक परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हा परिसर महाराष्ट्राच्या लोककला आणि संस्कृतीचा प्रेरणादायी केंद्रबिंदू बनविण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !