बाप मायेचा सागर - लेकीच्या संरक्षणासाठी बापाची धडपड, खंडाळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत जिवंत देखाव्यातून मुलींच्या शिक्षणाचा जागर

अन्यायाविरोधात लेकीसाठी ढाल बनणारा बाप, भावूक सादरीकरणाने विसर्जन मिरवणुकीत जिंकली उपस्थितांची मनं
Dharmveer Chhatrapati Sambhaji Maharaj, Ganesh utsav mandal, save girl, drama stage play, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
बाप म्हणजे घराचा पाया असतो, पण लेकीसाठी तो संपूर्ण आभाळ असतो." या उक्तीची प्रचीती खंडाळा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत उपस्थितांना आली. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गुलालाची उधळण होत असतानाच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्र  मंडळाने सादर केलेल्या 'बाप मायेचा सागर' या जिवंत देखाव्याने संपूर्ण खंडाळा नगरीचे आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 

बाप आणि लेकीच्या अतूट नात्याचे भावनिक दर्शन घडवतानाच मुलींचे संरक्षण आणि शिक्षण याबाबत जनजागृती करण्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला. लेकीच्या सुरक्षिततेसाठी प्रसंगी बाप आपला जीवही पणाला लावतो, ही भावना देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली. त्याचबरोबर मुलींना सुरक्षित वातावरण देणे, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या भवितव्याबाबत प्रत्येक पालकाने सजग राहणे, हा सामाजिक संदेश मंडळाने दिला.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. भावनिक प्रसंग आणि सामाजिक वास्तवाची सांगड घालणाऱ्या या देखाव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देखाव्यात एका सर्वसामान्य बापाची गरिबी, सामाजिक आव्हाने आणि मुलीच्या रक्षणासाठी लागणारी धडपड ताकदीने मांडली गेली. मुलीला सुरक्षित वातावरणात शिक्षण देऊन तिला पायावर उभे करण्यासाठी बाप काय काय सोसतो, याचे वास्तववादी दृश्य उभे केले गेले.

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळाच्या या उपक्रमामागे अध्यक्ष अमोल चव्हाण, उपाध्यक्ष विक्रम खंडागळे, कार्याध्यक्ष सर्जेराव संकपाळ, खजिनदार प्रणव खंडागळे आणि सांस्कृतिक अध्यक्ष अभिजीत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गणेशोत्सव केवळ उत्सवाचा नाही, तर समाजप्रबोधनाचाही हा संदेश देत खंडाळ्यातील या जिवंत देखाव्याने ‘लेकी वाचवा, लेकी शिकवा आणि तिच्या सुरक्षित भवितव्यासाठी सजग राहा’ अशी हाक दिली.

मुलींना केवळ जन्म देणे पुरेसे नाही, तर त्यांना सुरक्षित ठेवून शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे." असा स्पष्ट संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न धर्मवीर छत्रपती संभाजीराजे मित्र  मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. या उपक्रमाचे खंडाळा शहरासह संपूर्ण परिसरातून अत्यंत कौतुक होत आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !