संतोष पंडित यांना सत्र न्यायालयाकडून जामीन

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका
Santosh Pandit granted bail, pune, maharashtra, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (फैजल पठाण)
पुण्यातील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्युबर संतोष पंडित यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने ₹२५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय दिला.

३ सप्टेंबरला झाली होती अटक
कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी संतोष पंडित यांना अटक केली होती. अटकेनंतर त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित गुन्ह्यासाठी कमाल तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असल्याचे नमूद केले. त्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

जामीन देताना न्यायालयाच्या अटी
संतोष पंडित यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार
तक्रारदाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही संपर्क साधता येणार नाही.
प्रकरणातील पुरावे किंवा तपासावर परिणाम होईल अशी कोणतीही छेडछाड करता येणार नाही.
न्यायालयाने घातलेल्या इतर अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
या प्रकरणात संतोष पंडित यांच्या बाजूने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला की, त्यांनी वापरलेल्या शब्दांचा कोणताही गैरहेतू नव्हता किंवा महिलेच्या लज्जेचा अनादर करण्याचा प्रयत्न नव्हता. अधिकृत कायदेशीर प्रक्रियेनंतर आता त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.
या निर्णयामुळे काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या संतोष पंडित यांना दिलासा मिळाला आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !