महिला महाविद्यालय, कराडच्या दूरशिक्षण विभागाला Online MBA व Online MCA अभ्यासक्रमांना मान्यता

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता
Approval granted to the Distance Education Department of Mahila Mahavidyalaya, Karad, for Online MBA and Online MCA programs, karad, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
कराड : शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालय, कराड येथील दूरशिक्षण विभागासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU), नाशिक यांच्या स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन मार्फत  Online MBA व Online MCA अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.

महिला महाविद्यालय, कराड हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मान्यताप्राप्त अभ्यासकेंद्र असून त्याचा अभ्यासकेंद्र क्रमांक ६४६६A असा आहे. विद्यापीठाच्या मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून या अभ्यासकेंद्रामध्ये Online MBA आणि Online MCA या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नोकरी, व्यवसाय तसेच इतर कारणांमुळे नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आपल्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येणार असल्याने उच्च शिक्षण अधिक सुलभ, लवचिक आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होणार आहे.

महिला महाविद्यालय, कराडला Online MBA व Online MCA अभ्यासक्रमांसाठी मिळालेली ही मान्यता महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. या माध्यमातून कराड व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या मान्यतेबद्दल शिक्षण मंडळ, कराडचे चेअरमन श्री. बाळासाहेब कुलकर्णी, व्हॉइस चेअरमन श्रीमती अनघा पराडकर, सचिव श्री. चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव श्री. राजेंद्र लाटकर व संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !