कृष्णाकाठी महिला भाविकांची मांदियाळी; धार्मिक कार्यक्रमांनी भुईंज नगरी भक्तिमय
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
श्री क्षेत्र भुईंज येथे मंगळवारी ऋषिपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक सोहळा भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात दिमाखात संपन्न झाला.
कृष्णा नदीकाठावर महिला भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्नानपर्वणीस मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच नदीकाठ भाविकांच्या उपस्थितीने गजबजून गेला होता.
ऋषिपंचमीनिमित्त महिला भाविकांनी कृष्णा नदीत पारंपरिक पद्धतीने स्नान करून ऋषीपूजन, अभिषेक व विविध धार्मिक विधी केले. आचार्य भृगुऋषी आश्रम परिसरातही भाविकांची मोठी गर्दी झाली होती. धार्मिक विधी, प्रवचन, दर्शन, होमहवन, सामुदायिक आरती आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांनी सोहळ्याला भक्तिमय वातावरण प्राप्त झाले.
आचार्य भृगुऋषी आश्रम, दत्त सेवेकरी ट्रस्ट, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, सद्गुरू आण्णांच्या लेकी, श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट तसेच भुईंज ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य प. पू. सद्गुरू श्री नारायण महाराज ऊर्फ आण्णा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच सद्गुरू टेंबे स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. आचार्य भृगुऋषी समाधीचे पूजन व धार्मिक विधींमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
महिला भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भुईंज पोलिस ठाण्याच्या वतीने कृष्णा नदीकाठावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ऋषिपंचमी सोहळ्याला मोठी रंगत आली. या निमित्ताने भुईंजच्या प्राचीन आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरेचा जागर पुन्हा एकदा झाला,
या कार्यक्रमास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पुनम झगडे,वाई पंचायत समीतीच्या उपसभापती वर्षा जगताप,सदस्या डॉ.सुरभी भोसले,महिला पोलीस अंमलदार गीता ननावरे,यांच्या सह विविध जिल्ह्यातील महिला भाविकांची उपस्थिती होती,
प्रारंभी जेष्ठ महिला सेवेकरी राजश्री भोसले पाटील यांनी या व्रताचा महिमा सांगितला आचार्य भृगुरूषी आश्रमाच्या वतीने भैय्यासाहेब जाधवराव,नाना खरे यांनी स्वागत केले,संजय शिंदे व राजू वारागडे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले,
दिवसभरात परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. श्री कृष्णामाईच्या जयघोषाने आणि धार्मिक वातावरणाने भुईंज नगरी पूर्णपणे भक्तिमय झाली होती.
भुईंज गावाला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभलेली आहे. कृष्णाकाठच्या या पवित्र भूमीचा सर्वांगीण विकास करणे आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे. भुईंज या तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसांत हा वर्ग घेऊन देवी महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच आचार्य भृंगऋषी मठ परिसर विकसित करू असा विश्वास पंचायत समितीच्या सदस्या डॉ. सुरभी भोसले यांनी बोलून दाखवला यावर उपस्थित महिला भाविकांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
-----------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा






























