सोन्याच्या पावलांनी येणार लाडकी गौराई - जाणून घ्या आगमन, पूजन आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त

अनुराधा नक्षत्रावर माहेरवाशिणीचे आगमन; पालेभाजी-भाकरीच्या सात्त्विक नैवेद्यापासून पंचपक्वान्नांपर्यंत उत्साहाची तयारी

Preparations to welcome Gauri, Solapur, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सोलापूर(प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
 
गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाच्या पाठोपाठ माहेरवाशीण म्हणून घराघरांत प्रवेशणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठ महालक्ष्मी म्हणजेच गौराईच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. सोन्याच्या पावलांनी येणाऱ्या या माहेरवाशिणीसाठी सुंदर रांगोळ्या, फुलांची आरास आणि रोषणाईने घरंगणे सजली आहेत. यंदाच्या उत्सवासाठी शास्त्रोक्त तिथी आणि नक्षत्रांनुसार शुभ मुहूर्त निश्चित झाले आहेत.

​गौरी उत्सवाचे शास्त्रशुद्ध मुहूर्त
​शास्त्रानुसार महालक्ष्मीचे आगमन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर, तर विसर्जन मूळ नक्षत्रावर करण्याची प्राचीन परंपरा आहे.

​गौरी आवाहन (गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६):
अनुराधा नक्षत्रावर सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपूर्वी गौरीचे आवाहन करणे शास्त्रसंमत व अत्यंत शुभ राहील. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रास प्रारंभ होईल.
गौरी पूजन (शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६)
या दिवशी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र अस्तित्वात असल्याने भाविकांना दिवसभरात कोणत्याही वेळी विधिवत पूजन आणि महानैवेद्य दाखवता येईल.
गौरी विसर्जन (शनिवार, १९ सप्टेंबर २०२६):
मूळ नक्षत्रात सूर्योदयापासून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत महालक्ष्मीचे  विसर्जन करता येईल.
​घरात घेण्याची मंगल परंपरा आणि औक्षण
​गौराईच्या आगमनावेळी एका पाटावर ताट ठेवून त्यामध्ये परंपरेनुसार एक अथवा दोन मुखवटे ठेवले जातात. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढून आरतीचे ताट सज्ज केले जाते. घरातील सुवासिनी हळद-कुंकू आणि अक्षता वाहून मुखवट्यांचे भक्तिभावाने औक्षण करतात. आगमनाच्या प्रसंगी तुळशीचेही पूजन केले जाते व सुरुवातीला दूध-साखरेचा गोड नैवेद्य अर्पण केला जातो.
​घरात गृहप्रवेश करताना सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना करत परंपरेने चालत आलेले संवाद म्हटले जातात:
​"गौरी आल्या कशाच्या पावली? धनधान्याच्या पावली... हळदी-कुंकवाच्या पावली... सौभाग्याच्या पावली... सोन्या-चांदीच्या पावली!"
​साज-शृंगार आणि पारंपरिक नैवेद्याचा थाट
​घरात आगमन होताच गौराईला पारंपरिक नऊवारी साडी, दागदागिने आणि सुगंधित फुलांनी नटवले जाते. आगमनाच्या पहिल्या दिवशी खास पालेभाजी आणि भाकरीचा सात्त्विक नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे; काही भागांत यामध्ये अळूची वडी व ढेसे यांसारख्या पारंपरिक भाज्यांचाही समावेश असतो. दुसऱ्या दिवशी पूजनाच्या मुहूर्तावर विविध पक्वान्नांचा भरगच्च नैवेद्य दाखवून माहेरवाशीण गौराईचा आदरसत्कार मोठ्या उत्साहात केला जातो.
      -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

-----------------

Sudhakar pant paricharak, anniversary, shivshahi new, advertise,

MNS leader, dilip dhotre, birthday, shivshahi news,

-----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra, birthday celebration, MLA Abhijeet Patil,

---------------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

--------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !