अल्प हप्त्यात विमा संरक्षण घेण्याचे शाम झोरे यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (शुभम कोदे)
प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजनेत सहभागी झाल्यामुळे आरफळ येथील कै. अमर मुगुटराव नलगे यांच्या कुटुंबाला त्यांच्या अपघाती निधनानंतर दोन लाख रुपयांची विमा रक्कम मिळाली. या योजनेमुळे संकटकाळात कुटुंबाला आर्थिक आधार मिळत असल्याचे प्रतिपादन दि वाई अर्बन को-ऑप. बँकेच्या सातारा विभागाचे सहाय्यक सरव्यवस्थापक शाम झोरे यांनी केले.
दि वाई अर्बन बँकेच्या आरफळ शाखेतील मृत खातेदार कै. अमर नलगे यांच्या पत्नी रेश्मा अमर नलगे यांना ग्रामपंचायत सदस्या पूजा वैभव पवार यांच्या हस्ते दोन लाख रुपयांची विमा रक्कम प्रदान करण्यात आली. यावेळी शाखा समिती सदस्य ज्ञानेश्वर साबळे, उमेश पाटील, विकास पवार, महेश पाटील तसेच ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शाम झोरे म्हणाले, “अल्पशा वार्षिक हप्त्यात कुटुंबाला मोठे आर्थिक संरक्षण मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने विमा योजनांचा लाभ घ्यावा.” आरफळसारख्या ग्रामीण भागात वाई अर्बन बँकेमार्फत नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, प्रत्येक कुटुंबाने बँकेत बचत खाते सुरू करून प्रधानमंत्री जीवनसुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
कै. अमर नलगे यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले होते. त्यांनी विमा योजनेत सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगी दोन लाख रुपयांचा आर्थिक आधार मिळाला. “भविष्यातील आकस्मिक संकटांचा सामना करण्यासाठी विमा संरक्षण आवश्यक असून, बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांचाही नागरिकांनी लाभ घ्यावा,” असे झोरे यांनी सांगितले. शाखाधिकारी महेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा





























