कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
लोकआग्रहास्तव किसन वीर व खंडाळा दोन्ही कारखाने ताब्यात घेतले. परंतू, ते कसे चालवायचे हा यक्ष प्रश्न आमच्या व्यवस्थापनापुढे होता. सभासदांनी दिलेल्या भाग भांडवलामुळे कारखाना सुरू केला व तुम्ही टाकलेल्या विश्वासावरच इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यात यशस्वी ठरलो. शेतकऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थक ठरविण्याबरोबरच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी किसन वीर कारखाना ही अर्थवाहिनी असुन ती टिकली पाहिजे, हा निर्मळ हेतु नामदार मकरंद पाटील यांनी मनाशी बाळगला असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांनी केले.
भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी ते अध्यक्षस्थानी बोलत होते. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील यांना या सभेस उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे संचालक संदिप चव्हाण यांनी सभेचे अध्यक्षस्थान खासदार नितीन पाटील यांनी भ़ुषवावे असा ठराव मांडला व त्यास सचिन साळुंखे यांनी अनुमोदन दिले.
खासदार नितीन पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने कारखान्यास ऊस दिला. त्यांचे मी मनापासुन आभार मानतो. कारण त्यांना खात्री होती की, आपली संस्था टिकली पाहिजे, ती टिकली तरच शेतकऱ्यांचे अस्तित्व राहिल. कारखाना सुरू असला तरच शेतकऱ्यांना किंमत असते. आपला कारखाना बंद असल्यास दुसरे कारखाने शेतकऱ्यांना विचारत नाहीत. स्व. अजितदादा पवार यांच्यामुळेच आपण तरलो आहोत. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच किसन वीर व खंडाळा कारखाना जिवंत आहेत. बँकांच्या सेटलमेंटमध्ये जवळपास दोनशे कोटीची रक्कम वाचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. खंडाळा कारखान्याच्या सर्व बँकांची कर्जें भागविण्यात आलेली असून किसन वीरच्या दोन बँकांची कर्जे उरलेली असुन लवकरच तेही भरण्यात येतील.
मागील चारही गळित हंगाम शेतकरी व कामगारांच्या विश्वासामळेच पार पाडलेले असुन येणाऱ्या गळित हंगामामध्ये संचालक मंडळाने किसन वीरसाठी ७ लाख व खंडाळ्यासाठी ४ लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवलेले आहे ते यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. मागील हंगामामध्ये जर गाळपाची उद्दिष्ठपुर्ती झाली असती तर आज कारखान्याची परिस्थिती वेगळी असती, आपल्याला बँकांकडून पैसे उपलब्ध करता आले असते व ऊस बीलास होणारा विलंब हा झाला नसता. कारखान्यास जो १०० कोटीचा तोटा आहे. तो कमी झाला तरच आपल्याला बँक साखर पोत्याला पैसे देईल. कारखान्याची परिस्थितीची जबाबदारी फक्त संचालक मंडळाची नसुन ती शेतकरी व कामगारांची सुद्धा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस इतर कारखान्यांना न घालता संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला घातला पाहिजे, तरच ही परिस्थिती सुधारेल. कामगारांच्या त्यागाची आम्हालाही किंमत आहे. त्यांची सर्व देणीही आम्ही देणार असुन त्यांचे कोणतेही नुकसान करण्याची संचालक मंडळाची मानसिकता नाही. कामगारांच्या मनामध्ये काहीजण मनभेद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सोशल मिडीयावर दिसते. परंतु त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कामगारांचा उपयोग करू नये, यातून निषन्न काहीही होणार नसुन हे संस्थेसाठी हितावह नसल्याचेही खासदार पाटील यांनी नमुद केले.
संचालक मंडळाचा कसलाही बोजा कारखान्यावर नसुन अत्यंत काटकसरीने संचालक मंडळ काम करीत आहे. आमच्या नितीमत्तेवर तिळमात्र शंका घेऊन नये. आर्थिक गर्तेंत रूतलेला कारखाना बाहेर काढायचा व तो प्रगती पथावर न्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालण्याचे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले.
विषय पत्रिकेचे वाचन व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले. सुत्रसंचालक विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले.
यावेळी शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे,रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, खंडाळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, दत्तानाना ढमाळ, चंद्रकांत ढमाळ, डी. एन. भोसले, शिवाजीराव महाडीक, रामभाऊ लेंभे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोस्ळकर, प्रतापराव पवार, महादेव मस्कर, शशिकांत पवार, पंचायत समितीचे सभापती विक्रांत डोंगरे, मार्केट कमिटीच चेअरमन मोहन जाधव, विजयराव येवले, रमेश गायकवाड, पोपट जगताप, दिपक बाबर, कुमार बाबर, राजेंद्र शिंदे, प्रमोद वारागडे कांतीलाल पवार, राजेंद्र सोनावणे, बबनराव साबळे अजय कदम, अरविंद कदम, ॲड. उदयसिंह पिसाळ, शशिकांत भोईटे, चंद्रकांत फडतरे, रविंद्र भोसले, धनंजय बनकर, दिलीप हगीर, सचिन जमदाडे, सुर्यकांत बर्गे , सत्यजीत वीर, युवराज पवार, चरण गायकवाड, गिरीश जगताप, अमृत गोळे, रामदास शिंदे, सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











