अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिवरापहाडीच्या चिमुकल्यांचा विजय - शाळेला मिळाले नवे शिक्षक

‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवारांकडून तातडीने दखल
Bottle mic reporting, students, DCM Sunetra Pawar, hiwara phadi, Beed, Maharashtra, shivshahi news,

​शिवशाही वृत्तसेवा, बीड
"आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या..." अशी आर्त हाक मारणाऱ्या बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थिनींच्या सोशल मीडिया रिपोर्टिंगची अखेर राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली असून, शिक्षण विभागाने या दुर्गम भागातील शाळेत शिक्षक शिवाजी जोगदंड यांची तातडीने नियुक्ती केली आहे.

​बीड तालुक्यातील 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरापहाडी' (केंद्र जरूड) येथील विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील शिक्षकांच्या अभावाकडे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला होता. हातात पाण्याची 'बॉटल' माईक म्हणून धरून या चिमुकल्यांनी सोशल मीडियावर एका रिपोर्टरच्या आविर्भावात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शिक्षकांअभावी शिक्षणाचे होणारे नुकसान आणि भविष्यात अधिकारी बनण्याची आपली जिद्द या मुलींनी अतिशय प्रभावीपणे मांडली होती.

​हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या व्हिडिओची दखल घेत बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सूत्रे हलवून शिक्षक शिवाजी जोगदंड यांची हिवरापहाडी शाळेत नियुक्ती केली.

​पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या तत्परतेमुळे हिवरापहाडीच्या मुलींच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली असून, दुर्गम भागातील शिक्षणाचा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांमधून प्रशासनाचे व पालकमंत्र्यांचे आभार मानले जात आहेत. चिमुकल्यांच्या एका क्रिएटिव्ह रिपोर्टिंगमुळे संपूर्ण शाळेचे भविष्य उजळले असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !